सुरक्षित आणि संवेदनशिल समाजाची वाटचाल
स्त्री - पुरुष, आबालवृध्द सर्वांना कायद्यानुसार समान अधिकार आहेत.वाढत्या वयातील मुलामुलींना विशेष करून लैंगिक समानतेबाबत शिक्षण देणे हे या दिशेकडे टाकलेले पहिले पाऊल आहे.
लैंगिक हिंसा, घरगुती हिंसाचार आणि महिलांविरुद्ध च्या गुन्ह्यांची पाळेमुळे, या मानसिकतेत आहेत . ती मानसिकता बदलावी, गुन्हेगारी कमी व्हावी आणि पीडितांना न्याय मागण्यासाठी धैर्य यावे यासाठी केलेला हा सामुदायिक प्रयत्न आहे.
महिलांविरोधातील गुन्हे रोखण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे समाजातील स्त्रिया व पुरुष यांना दिली. जाणारी वेगवेगळी वागणूक आणि त्यांना उपलब्ध असलेल्या असमान विकासाच्या संधी होय.
या बाबतची उदाहरणे व चर्चा मुलान, मुलींसोबत घडवून आणणे व पोलीस विभागातर्फे त्यांना कायदेविषयक बाबींची जाणीव करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. अनेक वेळा आपल्या समाजातील मुलींमध्ये अथवा लहान मुलांमध्ये देखील लैंगिक अत्याचार, किंवा इतर शोषण बाबत तक्रार करण्याचे धैर्य नसते. घरापासून ते कामाचे ठिकाणापर्यंत असलेला, लैंगिक असमानतेचा परिणाम व त्यातील अंतर संबंध समजून घेणे हे एक सशक्त भावी पिढी बनवण्यासाठी महत्त्वाचे ठरेल.




तरुण मुले आणि मुलींना लैंगिक समानतेबद्दल शिक्षण देणे
चर्चा
लहान मुले, महिला तसेच जेष्ठ नागरिकांवरील घरगुती हिंसाचार अथवा त्यांचेवर होणारे इतर अपराध यांना जन्म देणाऱ्या मनोवृत्ती बद्दल बोलणे आणि शालेय वयापासूनच लिंग भावाबाबत मुला - मुलींना जागृत करणे, ज्यायोगे त्यांचे मध्ये आपले अधिकार आणि कर्तव्य बाबत जाणीव निर्माण होईल.
संवेदनशील लोक
अभिन्न हे नाव जसे आहे त्याप्रमाणे मुले - मुली, स्त्री - पुरुष हे भिन्न भिन्न आहेत. परंतु अधिकार आणि कर्तव्य यांच्या बाबतीत अभिन्न म्हणजेच एक आहेत. सर्वांनाच समाजात सन्मानपूर्वक राहण्याचा आणि कोणतीही भीती न बाळगता कोणतेही शिक्षण नोकरी व्यवसाय व दैनंदिन कामे करण्याचा समान अधिकार आहे.
नवीन विचारांची रचना
आजच्या जगात जर आपल्याला एक सशक्त आणि समानतेवर आधारित समाज हवा असेल, तर या प्रश्नांना वाचा फोडणे आणि या प्रश्नात बद्दल बोलणे हे अतिशय आवश्यक आहे. शालेय आणि संवेदनक्षम वयापासूनच या विषयाबाबत शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचेशी पोलीस विभागामार्फत संवाद साधण्याचा हा प्रयत्न आहे. ज्यायोगे शिक्षक, पालक व मुले यांना स्त्रीयांविरुद्धच्या अन्याय- अत्याचार बाबत, विचार करण्यास प्रवृत्त करता येईल तसेच कायदेविषयक जागृकता सर्वांमध्ये तयार करता येईल.